महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई : पंढरपूर शहराध्यक्षपदी शंकरराव कदम यांची निवड, तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी शंकरराव कदम यांची सर्वानुमते निवड जाहीर
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव कदम यांची निवड, तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे यांची नियुक्ती; २०२६–२०२७ कार्यकारिणी जाहीर.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ डिसेंबर २०२५ —JournalistAssociation महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव कदम यांची सर्वानुमते तसेच तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे यांची निवड करण्यात आली असून सन २०२६–२०२७ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. रविवार,दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी भक्ती मार्ग येथे ह.भ.प. महेश महाराज नलवडे यांच्या मठामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली — पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी नितीन करंडे,शहर कार्याध्यक्षपदी प्रमोद भोसले, तालुका उपाध्यक्षपदी अतुल मोरे, तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब काशीद, संपर्कप्रमुखपदी स्वागत खपाले, सचिवपदी कुमार कोरे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी विक्रम कदम यांची निवड करण्यात आली.
याशिवाय मार्गदर्शकपदी राधेश बादले-पाटील व रामदास नागटिळक यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमास रविंद्र कोळी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना शहराध्यक्ष शंकरराव कदम म्हणाले, २०२६–२०२७ या कालावधीसाठी माझी निवड करण्यात आली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. शहराध्यक्ष या नात्याने पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पत्रकार बांधवांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन.



