कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही; मंगळवेढा पंचायत समिती आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडेंचा इशारा
कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई अटळ – आमदार समाधान आवताडे : मंगळवेढा पंचायत समितीच्या प्रशासकीय आढावा बैठकीत आमदारांचे स्पष्ट निर्देश
मंगळवेढा पंचायत समितीच्या प्रशासकीय आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी कामात व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देत सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
mangalwedha-panchayat-samiti-review-meeting-mla-samadhan-avatade
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – mangalwedha news : कामात व कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यास अशा अधिकाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही,असा स्पष्ट इशारा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे mla samadhan avtade यांनी दिला.

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा पंचायत समितीच्या mangalwedha panchayat samity प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे संपन्न झाली. यावेळी ते विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना बोलत होते.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजना आदी विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांशी संबंधित शासकीय योजना वेळेत व प्रभावीपणे राबवाव्यात, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, अशा स्पष्ट सूचना आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाने समन्वय, पारदर्शकता व जबाबदारीच्या भावनेतून काम करावे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी जलजीवन मिशन योजना,भोसे प्रादेशिक योजना,आंधळगाव प्रादेशिक योजना, घरकुल योजना, विहीर योजना तसेच आरोग्य व शिक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तालुक्यात सुरू असलेली सर्व विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लोकाभिमुख कर्तव्यसेवेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख, नूतन नगरसेवक प्रा. येताळा भगत, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, काशिनाथ पाटील, सरोज काझी, सुधाकर मासाळ, माजी उपसभापती रमेश भांजे, शिवाजीराव पटाप, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, माजी उपसभापती धनंजय पाटील, संचालक गौडाप्पा बिराजदार, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष ॲड. शिवानंद पाटील, माजी सरपंच काका मिसकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
