पोषण जनजागृतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात स्पर्धांचे आयोजन, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण माहानिमित्त पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात निरोगी स्त्री व पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पोषण जनजागृतीसाठी रुग्णालयात स्पर्धांचे आयोजन, निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम

राष्ट्रीय पोषण माहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे निरोगी स्त्री व पाककला स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

pandharpur-subdistrict-hospital-poshan-mah-nirogi-stree-pakakala

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – Pandharpur News : राष्ट्रीय पोषण माहाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर येथे निरोगी स्त्री व पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. Health Awareness या स्पर्धांचे पारितोषिक वितरण वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती वर्षा भागवत कांबळे, द्वितीय क्रमांक श्रीमती शीतल रामदास रावळे, तृतीय क्रमांक श्रीमती रेवती विवेक कुलकर्णी यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीमती वैशाली महेश बिडवे यांना देण्यात आले. या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल ब्रदर गजानन विठ्ठल कपाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

निरोगी स्त्री स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती धनश्री धर्मराज डफळे, द्वितीय क्रमांक श्रीमती सुनिता संतोष देवामारे व तृतीय क्रमांक श्रीमती सोनाली सुहास सावंत यांनी मिळवला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक पुरुषोत्तम कदम यांनी केले. निरोगी स्त्री स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. सीमा इंगोले,श्रीमती आरती बनकर तसेच हिंद लॅब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास डॉ.रुचा खुपसंगिकर, डॉ.श्रीकांत नवत्रे, आहारतज्ज्ञ अनुराधा वाघमारे,मेट्रन सिंधुताई लवटे यांच्यासह सर्व इन्चार्ज व नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top