सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
बालिका शिक्षणाचा संदेश देत सनराईज पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम : सावित्रीबाईंच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती व बालिका दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
sunrise-public-school-shelve-balika-din-savitribai-phule-jayanti

शेळवे | संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज – महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व प्रशालेच्या सहशिक्षिका श्रुती भूमकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य व समाजातील योगदान विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.
सहशिक्षिका सौ.भिंगारे यांनी जयंती निमित्त शुभेच्छा देत बालिका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले.सावित्रीबाईंचा एक जरी विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केला तरच जयंती साजरी केल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल,असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी प्रशालेचे संगीत शिक्षक योगेश गायकवाड यांनी स्वतः रचलेले व स्वरबद्ध केलेले मी सावित्री होणार गं..! हे प्रेरणादायी गीत सादर केले. या गीताला सहशिक्षक मयूर भूमकर यांनी तबल्यावर साथ दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
