शेतकऱ्यांना लाईट देणं महत्त्वाचे – आमदार अभिजीत पाटील

शेतकऱ्यांना लाईट देणं महत्त्वाचे – आमदार अभिजीत पाटील

बाभुळगाव येथे ५ एम.व्ही.ए.नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

बाभुळगाव ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०३/०३/२०२६- पंढरपूर तालुक्यातील बाभुळगांव येथे ५ एम.व्ही.ए.उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.बाभुळगाव सबस्टेशन येथील वाढीव ५एम.व्ही.ए ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले.

इथून पुढे शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न भेडसावणार नाही ५ एम.व्ही.ए आधीचा ट्रान्सफॉर्मर असताना वाढीव क्षमतेसाठी ५ एम.व्ही.ए चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागलेला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना लाईट देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी भूमिका पार पाडत आहे. बाभुळगाव मधील रेल्वे लाईन येथील विजेचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सध्या अधिवेशन सुरू असल्याने तमाम जनतेने आपल्या परिसरातील आपल्या गावातील,प्रश्न,समस्या अधिवेशनात मांडण्यासाठी द्यावे असे यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

यावेळी वसंत चव्हाण,दिलीप चव्हाण, दशरथ चव्हाण,महादेव चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, सरपंच अमोल कोरके, जिल्हा परिषद सदस्य भारत कोरके,जिल्हा परिषद सदस्य अमित साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल, पंचायत समिती सदस्य विलास भोसले, उपसरपंच श्रीपाद चव्हाण, पै. महादेव चव्हाण,जीवन पाटील, गणेश गांडुळे, उद्धव चव्हाण, अमोल चव्हाण, मोहन पाटील, ओंकार चव्हाण, विठ्ठल कारखान्याचे संचालक जनक भोसले,दिनकर चव्हाण यांच्यासह महावितरणचे अधिकारी पाटणकर व सदानंद यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top