तहसीलदार मिनल भोसले यांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026 ने सन्मान

पनवेलच्या तहसीलदार सौ. मिनल भोसले यांना ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026’; सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

तहसीलदार मिनल भोसले यांचा सन्मान | ‘यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026’ ने गौरव

पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज –पनवेल येथील तहसीलदार सौ. मिनल सुधाकर भोसले यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या वतीने प्रतिष्ठेचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या प्रशासकीय कार्यातील प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार माजी खासदार रामशेठ ठाकुर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नवी मुंबईच्या महापौर, उपमहापौर, नगरसेवक तसेच अभिनेत्री सायली संजीव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ.मिनल भोसले यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागल्या असून, महिला सक्षमीकरणासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या कुटुंबीयांनी व सहकाऱ्यांनी अभिमान व्यक्त केला आहे. तुमच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Back To Top