किल्ले सिंहगड संवर्धन कामाची पाहणी; शिवकार्य करताना कामगार आणि मुक्या जनावरांची काळजी घ्या
सिंहगड संवर्धनात गुणवत्ता, पावित्र्य आणि श्रमाचा सन्मान जपण्याचे आवाहन
किल्ले सिंहगडावर सुरू असलेल्या संवर्धन कामाची पाहणी करताना कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि ऐतिहासिक पावित्र्य जपण्याच्या सूचना देण्यात आल्या. उन्हाळ्यात कामगार आणि सामान वाहून नेणाऱ्या गाढवांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देत सामाजिक बांधिलकीचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण (बारा मावळ प्रांत) यांच्या माध्यमातून देण्यात आले.
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज: ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सुरू असलेल्या किल्ले सिंहगड संवर्धन कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी गडाचे ऐतिहासिक पावित्र्य कायम राखत संवर्धनाचे काम शास्त्रीय पद्धतीने, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावे, तसेच कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना ठेकेदार आणि अभियंत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण (बारा मावळ प्रांत) यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.

सध्या सिंहगडावर ४० ते ५० कामगार प्रामाणिकपणे संवर्धनाचे काम करत असून, उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. दुपारी १ ते ४ या वेळेत कामाला विश्रांती देऊन सकाळी लवकर काम सुरू करावे तसेच सायंकाळी ५ ऐवजी ६ वाजेपर्यंत कामाचे नियोजन करावे,अशी सूचना करण्यात आली. यामुळे कामगारांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
याचबरोबर गडावर दगड, माती आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाढवांचीही काळजी घेण्यावर भर देण्यात आला. मुक्या जनावरांना वेळोवेळी पिण्याचे पाणी, चारा आणि उन्हापासून संरक्षण मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण (बारा मावळ प्रांत) यांच्या माध्यमातून देण्यात आले.

आपण आपल्या ज्वलंत इतिहासाचे पुनरुज्जीवन करत आहोत. हे शिवकार्य करताना कामगार आणि मुक्या जनावरांची काळजी घेणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या घामातूनच गडाचा इतिहास पुन्हा उभा राहत आहे,असा भावनिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण (बारा मावळ प्रांत) यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आला.
शिवकार्य करताना श्रमाला सन्मान मिळालाच पाहिजे, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण (बारा मावळ प्रांत) यांच्या माध्यमातून कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.






