ग्रामीण तरुणांच्या कल्पकतेला नवे पंख! नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती केंद्राची उभारणी
आमदार आवताडे यांचा पुढाकार; सोलापुरात नवकल्पनांना चालना देणारे केंद्र सुरू
सोलापुरात नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती केंद्राच्या उभारणीमुळे ग्रामीण तरुणांच्या कल्पकतेला चालना मिळणार असून प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा मिळणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.

Pandharpur nalanda news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –सोलापूर येथे नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती निर्मिती केंद्राच्या उभारणीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून या केंद्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमधील सर्जनशीलता व नवकल्पनांना मोठी चालना मिळणार आहे. या उपक्रमाबाबत बोलताना आमदार आवताडे यांनी या केंद्राच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवा, प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक त्या ठिकाणी आम्ही निश्चित पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करत या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.
गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजिलेल्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरी एसीआयसी – स्वेरी या केंद्राच्या उदघाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉ.अनील काकोडकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे होते.
महाराष्ट्र गीत,स्वेरी गीत व दीपप्रज्वलना नंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीने ग्रामीण भागात इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार, नीती आयोगाचे सहकार्य, संशोधन विभागाची गरुड झेप आदीबाबत सविस्तर माहिती दिली.

यापूर्वी स्वेरीने रुरल डेव्हलपमेंट केंद्र, वायफाय यंत्रणा आणि लगतच्या पाच शाळांना तंत्रज्ञानाने जोडून जी इकोसिस्टम उभी केली आहे, ती खरोखर खूप कौतुकास्पद असून संशोधन क्षेत्रात हा एक इतिहास होता. स्वेरी नावातील आर (रिसर्च) हेच सर्व सांगून जातो. स्वेरीत बोलण्यापेक्षा कामातून अधिक कार्य जाणवते. त्यामुळे या ठिकाणी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर या केंद्राची स्थापना करण्यात आली. एकूणच ज्या प्रॉब्लेमच्या आधारे प्रश्न सुटतील तेच खरे संशोधन -डॉ. अनिल काकोडकर अणुशास्त्रज्ञ भारत
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये सौ.सुयशा काकोडकर,डॉ. जान्हवी गांगल, तन्मय मुखर्जी, अनघा पाठक, महेश पाठक, शरद भोसले, स्वप्नील कांबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, कामगार आयुक्त दत्ता पवार, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वंदना बीडकर, अनिता पवार, विलास मस्के, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा आदींचा समावेश होता.तसेच शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी आणि स्वेरी संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच इतर विश्वस्त आणि सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या केंद्रासाठी डॉ.हर्षवर्धन रोंगे हे समन्वयक म्हणून काम पाहत असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता तळवलकर यांनी केले. आभार प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी केले.
हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देणारा ठरणार असून, शिक्षण व संशोधन क्षेत्रात नवे दालन उघडणार आहे.

नीती आयोग व व्हील्स ग्लोबल फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरु झालेल्या या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर – स्वेरी च्या उदघाटनाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तरीही याचे स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांचे नेतृत्वाखाली स्वेरीमध्ये उत्तम पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी, पालक वर्ग यांचे भोजनापासून ते प्रस्थानापर्यंतच्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्वजण समाधानाने परतले.

