पंढरपूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; MIT कॉलेजचा HSC निकाल 97% पेक्षा अधिक

MIT गुरुकुल कॉलेजचा बारावी निकाल दमदार! वाणिज्य शाखा 100% तर पियुष साळुंखे प्रथम

पंढरपूरच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; MIT कॉलेजचा HSC निकाल 97% पेक्षा अधिक

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील माईर्स एमआयटी पुणे संचालित विश्वशांती गुरुकुल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी (HSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत वाणिज्य शाखेचा निकाल तब्बल १०० टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे.

वाणिज्य शाखेत पियुष साळुंखे याने ९६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून अकाउंट्स व गणित या दोन्ही विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे.
तसेच सायली ढेकळे (९३.६७%) हिने द्वितीय तर तन्वी खपाले (८९%) हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये —
पारस शेठ – ८७.१७%
सोहम बहुरूपी – ८७%
प्रवीण चौधरी – ८७%
ओंकार लगड – ८६.३३%
परिनिता आवताडे – ८६%
या सर्व विद्यार्थ्यांनीही विशेष प्राविण्य मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशाबद्दल हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ यांच्यासह शिक्षकवृंद व व्यवस्थापन यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे. महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, भविष्यातही अशाच उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Back To Top