ठाण्यात गणपती मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यामुळे हाणामारी, 5 जखमी

[ad_1]

beat
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी गणपतीच्या मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यावरून हाणामारी झाली त्यात 5 जण जखमी झाले. 

सदर घटना रविवारी रात्रीची आहे एका 22 वर्षीय तरुणाने मिरवणुकीत भाग घेत असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील काही लोकांवर काचेची बाटली फेकली. त्यात तरुणांसह तीन जण जखमी झाले. मिरवणुकीत काही जणांनी तरुणाला पकडून चौकशी केली या नंतर पुन्हा  हाणामारी झाली. त्यात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिताच्या कलम 118 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top