[ad_1]

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीच्या फौजदारी प्रकरणात खटला दाखल केला असून शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची दोषमुक्तीतीची याचिका मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.
विशेष सत्राच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना मानहानीचा खटल्याला सामोरी जावे लागणार.
या वरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी निर्णयाचा विरोध केला होता. या प्रकरणी ठाकरे आणि राऊतांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले होते.
महानगर दंडाधिकाऱ्यानी त्यांचा जामीन मंजूर केला असून पुन्हा सुनावणीच्या वेळी दोघांनी दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली. याचिकेत आमच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, आमच्यावर केलेले आरोप संदिग्ध असून या प्रकरण आम्हाला फसवण्यात आले असून या प्रकरणातून आम्हाला दोषमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
ठाकरे आणि राऊतांनी दाखल केलेल्या याचिकेवर शेवाळे यांच्याकडून विरोध करण्यात आला असून दोघांचे युक्तिवाद ऐकल्यावर महानगर दंडाधिकाऱ्यानी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे.
Edited By -Priya Dixit
[ad_2]
Source link

