कारमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले

[ad_1]

Dead body
तामिळनाडूच्या पुदुकोट्टई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका निर्जन ठिकाणी एक कार उभी होती आणि त्यात पाच जणांचे मृतदेह पडलेले होते. ते एकाच कुटुंबातील होते आणि त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय आहे. 

एका रस्त्यावरून चालणाऱ्याने पोलिसांना ही कार उभी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधील मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठविले.पोलीस पुढील तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्रिची-कराईकुडी राष्ट्रीय महामार्गावर कार पार्क केलेली आढळली. काल सायंकाळपासून नमनसमुद्रण येथे त्याच ठिकाणी कार उभी असल्याचे पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

 

पुदुकोट्टई जिल्ह्यातील नमनसमुद्रम स्टेशन पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी पुदुकोट्टई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.मनीगंदन असे परिवाराच्या प्रमुखाचे नाव असून त्यांचा धातूचा व्यावसाय होता. त्यांच्यावर कर्ज होते. कर्जबाजारीमुळे त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यावर काही दबाब होता का याचा तपास पोलीस करत आहे. 

Edited by – Priya Dixit  

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top