विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/१/२२४ – राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

