महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, या नेत्याने दिला राजीनामा

[ad_1]

Rajan teli

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजन तेली लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UTB) मध्ये सामील होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. 

 

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी होते. तेली यांनी दावा केला की, त्यांनी गेल्या 10 वर्षात भाजपसाठी खूप कष्ट केले, पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असे देखील ते म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top