सहकार शिरोमणी कारखान्याचे कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ – कल्याणराव काळे
25 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न
भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि कारखान्यामध्ये काम करणारा कामगार यांना केंद्रबिंदु मानुन, संचालक मंडळाने नेहमीच वाटचाल केलेली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न् राहील. त्याचप्रमाणे कारखान्याशी एकनिष्ठ् राहुन संयमाने काम करणाऱ्या कामगारांना 17 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी बॉयलर प्रदिपन समारंभा प्रसंगी दिली.
कारखान्याच्या सन 2024-25 च्या 25 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,व्हा.चेअरमन भारत कोळेकर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. तत्पुर्वी संचालक जयसिंह देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रत्नमालाताई देशमुख यांच्या हस्ते होमहवन पुजा करण्यात आली. प्रारंभी शंकर महाराज चव्हाण व सज्जन भायगुडे यांच्या हस्ते श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

कल्याणराव काळे पुढे म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या 2024-25 गळीत हंगामात 4.50 लाख मे.टन गळीताचे उद्दिष्ट् ठेवलेले आहे. दैनंदिन 3500 ते 4000 टन ऊस उपलब्ध् होण्यासाठी आवश्यक तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार केलेले असून, त्यांना 10 कोटी पर्यत ॲडव्हान्सचे वाटप करण्यात आलेले आहे. तोडणी वाहतुक दरामध्ये 34 टक्के वाढ करण्यात आल्यामुळे तोडणी वाहतुक खर्चात वाढ झालेली आहे. तसेच केंद्र शासन प्रत्येक वर्षी एफआरपीमध्ये वाढ करत असताना साखरेच्या एमएसपीमध्ये गेल्या पाच वर्षात एकदाही वाढ केली नसल्यामुळे उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नाही. साखरेची एमएसपी प्रतीक्विंटल 4200 रुपयां पर्यत वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य् शासनाकडे साखर संघाच्या माध्यमातुन पाठपुरावा करण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापन अडचणीतुन मार्गक्रमण करीत ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी वाहतुकदार , कारखान्यातील कामगारांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला शेतकरी, वाहन मालक आणि कामगारांनी साथ द्यावी आणि यंदाच्या हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट् पुर्ण करण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत असे आवाहनही काळे यांनी केले.

यावेळी भरघोस पगारवाढ केल्याबद्दल कारखान्यातील अधिकारी,कर्मचारी व कामगारांच्यावतीने चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार करण्यात आला.जयसिंह देशमुख यांचा सत्कार कल्याणराव काळे यांनी केला तर सौ.रत्नमालाताई देशमुख यांचा सत्कार संचालिका सौ.उषाताई माने यांनी केला.प्रस्ताविक कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांनी केले. आभार संचालक मोहन नागटिळक यांनी मानले.सुत्रसंचालन समाधान काळे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक राजेंद्र शिंदे,मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, दिनकर कदम, तानाजी सरदार, योगेश ताड, युवराज दगडे, नागेश फाटे, परमेश्वर लामकाने, संतोष भोसले, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, संचालिका उषाताई माने,संगिता देठे,माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले,माजी संचालक पांडुरंग कौलगे,प्रताप म्हेत्रे,इब्राहिम मुजावर, भारत गाजरे,राजाभाऊ माने,विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे, शशिकांत बागल,यशवंत सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णु यलमार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष समाधान फाटे, भाळवणी ग्रामपंचायतीचे सरपंच रणजीत जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, जोतीराम पोरे, रामभाऊ कौलगे, दाऊद शेख, प्रदिप बागल, धनाजी कवडे, पांडुरंग भोसले, विलास चव्हाण, सिताराम माने, रघुनाथ पिसे, नवनाथ माने, दिनकर डोंगरे, बणु पुजारी, विलास चव्हाण, डॉ.अनिल काळे, वसंत फाटे, शंकर चव्हाण, अंकुश चव्हाण, विक्रमसिंग बागल, बापु पाटील, संजय मासाळ, योगेश जाधव, हणमंत जमदाडेसर, कांतिलाल काळे, अरुण कदम, नारायण शिंदे, राजाराम गायकवाड, तुकाराम भुई, समाधान उपासे, कारखान्याचे सभासद, शेतकरी,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या सभासदांना साखर यावर्षी तरी देणार का ? असा प्रश्न सभासदांमधून विचारला जात आहे.

