समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने शिक्षकाने विनयभंग केल्याचे सांगितले, आरोपी शिक्षकाला अटक

[ad_1]

gang rape
मुंबईतील एका 17 वर्षीय मुलीने समुपदेशन सत्रादरम्यान उघड केले की तिला शिकविणाऱ्या एका अरबी शिक्षकाने सुमारे 10 वर्षांपूर्वी तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने सांगितले की, शिक्षक तिच्या घरी अरबी भाषा शिकवायला यायचा आणि तिने गृहपाठ केले नसले तर तिला अयोग्यरीत्या स्पर्श करायचा ही घटना ती 8 वर्षाची असताना घडली. 

पोलिसांनी या प्रकरणात आरोपी शिक्षकाला अटक केली असून आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top