मृतदेह सूटकेस मध्ये भरून फेकायला जाणाऱ्या वडील-मुलीला पोलिसांनी केली अटक

[ad_1]

arrest
आंध्र प्रदेश मधील नेल्लोर मधील राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या मुलीसोबत अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की,त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केली.व मृत महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीसोबत हा व्यक्ती रेल्वे स्टेशनवर पोहचला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथील एका 43 वर्षीय व्यक्ति आणि त्याची अल्पवयीन मुलगी यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या आरोपीने आणि त्याच्या अल्पवयीन मुलीने वृद्ध शेजारच्या महिलेचा मृतदेह चेन्नईमध्ये नेऊन टाकण्याची योजना बनवली होती. तसेच पोलिसांनी सांगितले की सोन्याच्या दागिन्यांसाठी या महिलेची हत्या करण्यात आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top