खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- कार्तिक वारी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची गर्दी झाली आहे.भाविक आंघोळीसाठी चंद्रभागेला जातात.पाणी जास्त प्रमाणात असून नदीपात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

अशात विकास बडे राहणार माळेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर हा व्यक्ती विठ्ठल वारीसाठी आलेला असताना त्याला खोल पाण्याचा अंदाज नसल्यामुळे तो बुडत असताना सोलापूर बचाव पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले.
सोलापूर बचाव पथकाने विकास बडे याला सुखरूप बाहेर काढल्याने या पथकाचे कौतुक केले जात आहे.
