अनिल सावंत यांना आमदार करायचे ते दोन्हीही तालुक्याच्या विकासाठीच-प्रा.लक्ष्मण ढोबळे

मार्ग निघाला ठीक नाहीतर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोबत घेऊन भावी आमदार अनिल सावंत यांच्या विजयासाठी आपल्याला पुढे जावं लागेल-प्रा.लक्ष्मण ढोबळे

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात जरी अनिल सायंत हा चेहरा जरी नवखा असलातरी तरी सावंत साहेबांनी सामाजिक आणि समाजोपयोगी अनेक कार्यक्रम घेऊन पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या आणि तरुणाईचे आकर्षक बनलेले दिसत आहेत.

पंढरपूर मंगळवेढातील मतदाराच्या काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या आहेत आणि त्या महाविकास आघाडीला घातक सुद्धा ठरल्या आहेत तरी देखील त्याच्यातून तिन्ही पक्ष श्रेष्ठींनी लक्ष्य घालून समोरच्या उमेदवाराची समजूत घालून मार्ग निघाला ठीक नाहीतर दोन्ही तालुक्यातील शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोबत घेऊन भावी आमदार अनिल सावंत यांच्या विजयासाठी आपल्याला पुढे जावं लागेल असेही प्रा.लक्ष्मण ढोबळे म्हणाले.

देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, करत राहणार आणि अनिल सावंत आमदार झाले की पंढरपूर मंगळवेढातील काही दुष्काळी भागात कोणावरतीही आपल्याला अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. कारण गल्ली तेथे उद्योग आणि घर तेथे माझ्या माय माऊलीला घरी बसुन उद्योग आणायची ताकत या नवख्या असलेल्या उमेदवारात आहे आणि ती त्यांनी घेतलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमातूनच पंढरपूर मंगळवेढ्यातील मतदारांनी आणि माय माऊली जनतेने पाहिलेली आहे असे प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. अनिल सावंत यांना आमदार करायचे ते दोन्हीही तालुक्याचा विकास आणि विकास करण्यासाठीच म्हणूनच आपल्याला अनिल सावंत यांना निवडून द्यावे लागेल.

Leave a Reply

Back To Top