पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२४/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर येथील क्षत्रिय समाजाच्यावतीने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची बैठक लावण्यात आली होती.या बैठकीला आमदार राम सातपुते यांनी उपस्थिती लावली.

याप्रसंगी क्षत्रिय समाजाच्यावतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच खंबीर नेतृत्व ही देशाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत क्षत्रिय समाजबांधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी सोलापूर मतदार संघातून मोदींच्या शिलेदारालाच मोठ्या बहुमताने निवडून आणण्यासाठी संकल्प जाहीर करण्यात आला .

याप्रसंगी माजी मंत्री व उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने क्षत्रिय समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top