शहरात मांस, मटण विक्रीस मनाई


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 :- कार्तिकी शुध्द एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर आहे.या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.या वारी कालावधी मध्ये दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस,मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.


भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी दि.11 ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे.



