आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारची देशाला आवश्यकता

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशवासियांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्त हिंदू संघटनांच्यावतीने संयुक्तरित्या आयोजित हिंदुत्ववादी संघटनांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याला आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. याप्रसंगी समस्त हिंदू संघटनांनी एकमुखाने जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे अशा घोषणा देत सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पाठींबा दिला. यावेळी समस्त हिंदू संघटनांचा उत्साह बघून लोकसभा विजयाचे आणि लोकसेवेचे बळ मिळाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशवासियांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, ही गोष्ट ऐतिहासिक आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आज काँग्रेसशासित राज्यांमध्ये हिंदू माता- भगिनींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल,तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकारची देशाला आवश्यकता आहे. आम्ही सर्व हिंदू रामभाऊंच्या रूपाने एका हिंदू नेतृत्वासोबत असून माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी मोदींच्या शिलेदाराला निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे त्यासाठी जोमाने काम करू, असे आश्वासन उपस्थितांनी दिले.  

Leave a Reply

Back To Top