राजधानी दिल्लीत 4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

[ad_1]

drugs
Delhi News : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पार्टी ड्रग्ज आणि एमडीएमए ड्रग्जची 4 कोटी रुपयांची मोठी खेप जप्त केली आहे. तसेच यामध्ये नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.   

 

मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्ल्लीमधील उत्तम नगर येथून अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एका घरातून MDMA दर्जाच्या सुमारे 7 हजार औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या, ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4 कोटी रुपये आहे.

 

आरोपी चुकूने सांगितले की, त्याचाही एक साथीदार असून तो त्याच्यासोबत ड्रग्ज पुरवण्यात गुंतलेला आहे. त्याचवेळी अहमदाबादमध्ये 1 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने 40 जिवंत काडतुसांसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top