मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचणार

[ad_1]

eknath shinde

social media

Eknath Shinde News :  महाराष्ट्रात सरकारचा नवा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी जुन्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यासाठी आज राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान राजभवनात पोहोचणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पूर्ण झाली असून, त्यानंतर आता सर्वांनाच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची प्रतीक्षा आहे. राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान राजभवनात पोहोचणार आहे. एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड बहुमताने विजय नोंदवल्यापासून नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. आजपासून जुन्या कार्यकाळाची तारीख संपत आहे, त्यानंतर नवीन कार्यकाळ सुरू करण्यासाठी पक्षाला लवकरात लवकर नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करावी लागेल. यावेळी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये बैठका आणि बोलणी सुरू झाली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top