एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार नाही, संजय शिरसाट यांचा खुलासा

[ad_1]

sanjay shirsat

sanjay shirsat

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये अद्याप बैठक सुरू आहे, मात्र यावेळी मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असून भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपपदाची ऑफर दिली जाणार असल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पद शिंदे यांनी अस्वीकार केल्यावर काय होणार याचे उत्तर संजय शिरसाट यांनी दिले आहे. 

 

या बाबत बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही कारणास्तव उपमुख्यमंत्री पद नाकारले तर त्यांच्यापक्षातून कोणत्या अन्य नेत्याला हे पद दिले जाणार. शिंदे केंद्रीय मंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये नक्कीच जाणार नाही. महायुतीने या विधानसभा निवडणूकीत चांगली कामगिरी केली या मध्ये युतीला 288 पैकी 230 जागा मिळाल्या.  

ALSO READ: दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही, तर आमच्या पक्षाचे अन्य कोणी नेते ते स्वीकारतील, त्यावर ते (शिंदे) सायंकाळपर्यंत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली. औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट यांनी आपली जागा कायम ठेवली आहे.

Edited By – Priya Dixit

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top