Fuel Prices: ‘भीतीमुळेच भाजपनं घेतला इंधन दरकपातीचा निर्णय, योग्य प्रत्यूत्तर मिळेल’


हायलाइट्स:

  • केंद्र सरकारकडून इंधनांच्या उत्पादन शुल्कात घट
  • भाजपशासित राज्यांत इंधनांच्या किंमतीच्या वॅट दरात कपात
  • भाजपेतर राज्यांत इंधनावरील वॅट कमी होणार?

नवी दिल्ली :पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय घेत केंद्र सरकारकडून दिवाळीच्या निमित्तानं जनतेला मोठा दिलासा दिलाय. केंद्राच्या या निर्णयानंतर पेट्रोलच्या दरांत ५ रुपयांनी तर डिझेलच्या किंमती १० रुपये प्रती लीटरनं कमी झालीय. यावर, बोलताना ‘इंधन दराच्या कपातीचा निर्णय केंद्र सरकारनं भीतीमुळे घेतल्याचं’ म्हणत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

‘हा हृदयापासून नाही तर भीतीतून घेण्यात आलेला निर्णय आहे. वसुली सरकारला लुटीचं प्रत्यूत्तर आगामी निवडणुकीतून द्यायचंय’ असं आवाहन प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेला केलंय.

या अगोदरही सरकारच्या संधीसाधू धोरणावर प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला होता. ‘सणासुदीचे दिवस आहेत. सामान्य जनता महागाईनं होरपळतेय. भाजप सरकारच्या लुटारी मानसिकतेनं सणापूर्वी महागाई कमी करण्याऐवजी गॅस सिलिंडर, पेट्रोल डिझेल, तेल, भाज्यांच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय. निवडणुकीच्या वेळी भाजप १-२ रुपयांनी किंमती कमी करून जनतेसमोर जाईल, तेव्हा त्यांना योग्य प्रत्यूत्तर मिळेल. जनता माफ करणार नाही’, असं प्रियांका गांधींनी म्हटलं होतं.

Modi at Kedarnath : काल सैनिकांसोबत दिवाळी, आज सैनिकांच्या जन्मभूमीवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi at Kedarnath : केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
केंद्रानं उत्पादन शुल्क कमी केल्यानं आपोआपच राज्यांच्या भागातील वॅट कमी होतो. तरीही, महागाई कमी करण्यासाठी केंद्रानं उत्पादन शुल्कात कपात करावी, हीच आमची मागणी राहील, असं काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलंय.


भाजपशासित राज्यांत वॅटमध्ये कपात

केंद्रानं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्यांनाही वॅट कमी करण्याचा सल्ला दिलाय. भाजपशासित राज्यांनी केंद्राचा हा सल्ला स्वीकारत वॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेश सरकारनं पेट्रोलवर ७ रुपये वॅट कमी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. गुजरात सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर ७ रुपये वॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, आसाम, कर्नाटक, त्रिपुरा, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकारनंही वॅट दरांत कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहेत.

Subrata Mukherjee Death: पश्चिम बंगाल मंत्र्यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन, ममता हळहळल्या
UP Elections: सरकारी कामांचा पाढा वाचताना योगींनी केली कब्रस्तान – मंदिरांची तुलनाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: