अर्थचक्रातील गुंतवणूक संधी; आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचा बिझनेस सायकल एनएफओ


हायलाइट्स:

  • शेअर बाजारातील रिटर्न हे वेगवेगळ्या बिझनेस चक्रांच्या टप्प्यांमुळे प्रभावित होत असतात.
  • कोणत्याही बिझनेस चक्राचे चार वेगवेगळे टप्पे असतात.
  • ज्यात वृद्धी, मंदी, घसरण आणि रिकव्हरी यांचा समावेश असतो.

मुंबई :आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचा बिझनेस सायकल एनएफओ १५ नोव्हेंबरपासून खुला होणार आहे. ही नवीन फंड ऑफर २९ नोव्हेंबर रोजी बंद होईल. हा एक ओपन एंडेड इक्विटी योजना आहे, जी बिझनेस सायकलवर आधारित गुंतवणूक संकल्पनेचे पालन करेल.

सोने दरात प्रचंड वाढ ; दोन सत्रात सोने आणि चांदी महागले, जाणून घ्या आजचा भाव
शेअर बाजारातील रिटर्न हे वेगवेगळ्या बिझनेस चक्रांच्या टप्प्यांमुळे प्रभावित होत असतात. कोणत्याही बिझनेस चक्राचे चार वेगवेगळे टप्पे असतात. ज्यात वृद्धी, मंदी, घसरण आणि रिकव्हरी यांचा समावेश असतो. सर्व टप्पे वेगवेगळे असतात मात्र त्यांना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर एक सकारात्मक गुंतवणूक अनुभव प्राप्त करण्यास मदत मिळू शकते. कोणतेही बिझनेस चक्र किती दिवस चालणार किंवा किती लवकर संपुष्टात येणार हे सूक्ष्म आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते.

इथेनॉलची किंमत वाढवली; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असा फायदा
प्रत्येक उद्योगाचे शास्त्र (डायनॅमिक्स) जसे की गुंतवणूक, गुंतवणुकीवरील परतावा, मार्जिन आणि स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेस सायकलच्या दरम्यान येत असतात. त्यामुळे इंडस्ट्री विशेष सायकल हे येणाऱ्या इकॉनॉमिक सायकलपेक्षा वेगळे असू शकते. त्यामुळेच योग्य वेळी योग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

गुंतवणूकदार होरपळले ; सेन्सेक्स गडगडला अन् एक लाख कोटींचा चुराडा
आदित्य बिर्ला सनलाईफचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालसुब्रमण्यम म्हणाले की, अर्थव्यवस्था वेळोवेळी विस्तारते आणि घसरणीच्या टप्प्यातून देखील जात असते. संशोधनातून असे दिसून येते की क्षेत्र बिझनेस सायकलच्या माध्यमातून चांगले प्रदर्शन करू शकत नाहीत. डिफेन्स सायकल जसे की एमएफसीजी, हेल्थकेअर आणि आयटी हे घसरणीच्या टप्प्यात चांगला परतावा देतात. तर बिगर डिफेन्स क्षेत्र जसे की मेटल्स, फायनान्शिअल आणि सिमेंट हे विस्ताराच्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करतात. आदित्य बिर्ला सनलाईफ बिझनेस सायकल फंड सक्रिय रूपात गुंतवणुकीच्या संधी ओळखतो. बिझनेस सायकलच्या दृष्टीने निधी वाटप करून चांगला परतावा निर्माण करतो.

ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज मठपाल यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांसाठी मार्केटमधील सायकल आणि कोणत्या क्षेत्रात कधी आणि कशी गुंतवणूक करावी किंवा गुंतवणूक काढावी याचा निर्णय घेणे कठीण होते. अशातच एक बिझनेस सायकल फंड जो अत्यंत सूक्ष्म विचार करून अर्थव्यवस्था आणि क्षेत्रीय सायकलवर आधारित विचार करून गुंतवणूक करेल. गुंतवणूकदारांसाठी एक सोपा उपाय होऊ शकतो आणि त्यांना या फंडाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळू शकतात.

गुंतवणूकदार इकॉनॉमिक सायकल आणि सेक्टर सायकल ओळखू शकत नाहीत. मार्केट सायकलमध्ये कोणत्या क्षेत्रात कधी गुंतवणूक करावी, कधी करावी आणि केव्हा करावी, केव्हा पैसे काढावे याबाबत निर्णय घेणे कठीण काम असते. अशावेळी आदित्य बिर्लाची बिझनेस सायकल स्कीम गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करते. यामध्ये किमान ५०० रुपये गुंतवणूक करता येईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: