उजनीतून 10 मे ला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर,दि 05/05/2024 :- सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दि.10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतचे मागणी पत्र देण्यात आलेले आहे. दिनांक 20 मे 2024 पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्यावतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 10 मे 2024 रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी लागतो. अंदाजे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.