लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

उपसभापतींनी घेतला लातूर शहराचा सखोल आढावा

मुंबई ,21 मार्च 2025-उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्या साठी ठोस नियोजन करावे.लातूर महानगर पालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

विधानभवनात लातूर महानगरपालिका कचरा,वाहतुक व्यवस्था,पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा आढावा व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक,शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व एसटी महामंडळा चे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या,शहरातील प्रमुख जलस्रोत,विहिरी व बोरवेलची स्वच्छता व दुरुस्ती करावी. पाणी वाचविण्या साठी जलसाक्षरता मोहिती राबवावी. तसेच लातूर शहरात पिवळ्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती, परंतू आता या समस्येचे निवारण झाले असून पुढेही शहराला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.तसेच पेट्रोल पंप व बस स्टँण्ड अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छता गृह तयार करण्यात येवून हे स्वच्छता गृहांची नियमित साफसफाई करण्यात यावी.लातूर येथे भूंकप झालेल्या भागात उद्याने तयार करण्यात आली असून या उद्यानांचा बचाव उन्हाळ्यात करण्यात यावा,अशा सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लातूर शहरातील कचरा, वाहतुक व्यवस्था, पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा आढावा व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा घेतला. लातूर शहरात मोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना बंदी करावी. नागरिकांना अवकाळी पाऊस किंवा आपत्ती परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी,असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading