आ.अभिजीत पाटील यांचे मध्यस्थीने पंढरपूरात सुरू ऊसतोड वाहतूकदारांचे उपोषण स्थगित

आ.अभिजीत पाटील यांचे मध्यस्थीने पंढरपूरात सुरू ऊसतोड वाहतूकदारांचे उपोषण स्थगित

फसवणुक झालेल्या वाहनमालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपूरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेचे उपोषण

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – ऊसतोड मजुरांचे माध्यमातून कारखान्यांना ऊसतोड पुरवठा करताना ट्रॅक्टर मालक हे मुकादमांना मध्यस्थ धरून मजुरांची टोळी करतात टोळी करीत असताना लाखो रुपयांचा अर्थिक व्यवहार मुकादम आणि वाहन मालक यांच्यात होत असतो मात्र काही मुकादमां कडून वाहनमालकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये फसवणुक झालेल्या वाहनमालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपूरात तहसील कार्यालया समोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन आपण तुमच्या सोबत कायम असुन फसवणुक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितल्याने हे उपोषण थांबविण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर टोळी मुकादमांकडून फसवणूक होत आहे. राज्यात जो ऊस वाहतूकदार करणारा वर्ग आहे तो छोटा शेतकरी आहे. शेतामध्ये मशागतीसाठी घेतलेला ट्रॅक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून ऊस वाहतुकी साठी लावत असतो त्यातून मिळणाऱ्या उत्पादनामधून उपजीविका करीत असतो एक दोन एकर शेती असलेला हा शेतकरी उसाची वाहतूक करतो आणि बाहेरून ऊसतोड मजूर पुरविणारा मुकादम हे 20 लाख ते 25 लाख रुपये बिनव्याजी ॲडव्हान्स घेत असतो.हे मुकादम ॲडव्हान्स घेऊन आणि करार केल्यानंतरही मजूर पुरवित नाहीत त्यामुळे फसवणूक होत आहे. परिणामी राज्यात फसवणूक झालेल्या काही ऊस वाहतूकदार यांनी आत्महत्याही केली आहे या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना सरकारने करावी यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,तहसिलदार सचिन लंगुटे ,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री मुजावर यांच्यासह अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते.

काबाडकष्ट करून ट्रॅक्टर ठेकेदार ऊसटोळी व्यवसाय करत असतो परंतू त्यांचीच फसवणूक करून मुकादम टोळ्या देत नाहीत त्यावर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना सुचना देऊन तत्काळ कारवाई करण्याचे सांगितले आहे – आमदार अभिजीत पाटील


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading