जळगाव पोलिसांनी तपास करत केली कारवाई
भडगाव,जि.जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०३/ २०२५- मंदीरात चोरी केलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवुन पोलीसांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत .

याबाबत माहिती अशी की दि.२३/०२/२०२५ रोजी सकाळी ०३.०० ते ०४.३० वाजेच्या दरम्यान कजगांव ता.भडगांव जि. जळगाव शिवारात शेत गट नं. १८९ रेल्वे पुलाजवळ असून फिर्यादीचे शेतात मंदिरात यातील अज्ञात आरोपी मजकूर याने फिर्यादी संजय चिला पाटील रा. कजगाव ता. भडगाव याचे शेतातील महादेव मंदिरातील १) १५,०००/- रूपये कि.चा पिंडेवरील पंचधातूचे वस्त्र कि.अं.जू.वा २) ५०००/- रूपये कि चा पंचधातूचा नाग कि.अं.जू.वा, ३) ५०००/- रूपये कि चा पंचधातूचे त्रिशूल कि.अं.जू.वा. असे फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणुन भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं. ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळाचे परिसरातील सीसी टीव्ही फुटेज आणि संशयितावर पाळत ठेवून होतो. त्यानंतर दि २०/०३/२०२५ रोजी रात्री ११.०० ते दिनांक २१/०३/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वाजताचे दरम्यान कजगाव गावातील भास्करनगर मधील महादेवचे मंदीरात यातील संशयीत आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी रा. कजगाव ता.भडगाव जि.जळगाव याने १) ५००० रूपये रोख रक्कम त्यात १०,२०,५०,१००, २००,५००, दराच्या चलनी नोटा अंदाजे २) ३००० रूपये किमतीचे एंप्लिफायर जू.वा.कि.अ. असे एकूण ८०००/- रु. रोख व एप्लिफायर असे चोरी केल्याने भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. १०३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे फिर्यादी अर्जुन विठ्ठल शिंदे वय ४५ धंदा शेती रा.भास्करनगर कजगाव ता.भडगाव जि.जळगाव यांचे फिर्याद वरुन वरील संशयीत याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधिक्षक सौ कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल चाळीसगाव भाग यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा तपासात गोपनिय माहिती वरुन संशयीत इसम आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी रा.कजगाव ता.भडगाव जि.जळगाव याच्याबाबत माहिती काढून त्यास त्याचे घरी जावुन ताब्यात घेवून भडगाव पोलीस स्टेशन येथे घेवुन आल्यानंतर त्यास गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यास पुन्हा इतर साथीदारांबाबत विचारपुस केली असता आम्ही पाळत ठेवलेला संशयित इसम मिथुनसिंग मायासिंग बावरी रा. कजगाव ता. भडगाव हा देखील माझ्या सोबत मंदीरात चोरी करण्यासाठी होता असे सांगितल्याने त्यासदेखील त्याचे राहते घरुन ताब्यात घेण्यात आले.संशयीत मिथुनसिंग मायासिंग बावरी रा. कजगाव ता.भडगाव याने देखील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोघा आरोपींना दि. २१/०३/२०२५ रोजी २०.४९ वा अटक करण्यात आली. ते अटकेत असतांना त्यांचेकडे इतर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी अजुन इतर ठिकाणी संजय चिला पाटील रा. कजगाव ता.भडगाव यांचे शेतातील रेल्वे पुलाजवळ महादेव मंदीरात देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर सदर आरोपी हे अटकेत असतांना त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला रोख ३०००/ रुपये व ३०००/- रु.कि.चा ऍप्लिफायर असा काढून दिला तसेच भडगाव पो.स्टे. गु.र.नं. ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम्म ३०३ (२) प्रमाणे या गुन्ह्यातील महादेवाचे पिंडेवरील पंचधातूचे वस्त्र व महादेव मंदिराचे पंचधातूचा नाग तसेच पंचधातूचे त्रिशूल असे एकुण २५,०००/- रु.कि.चा मुद्देमाल चोरुन घेवुन गेले होते. सदर चोरी करुन घेवून गेलेला मुद्देमाल हा त्यांनी अज्ञात इसमाकडे विक्री करुन टाकलेला आहे. त्यांना विक्री केल्याचे पैसे मिळाले होते ते घरी ठेवलेले असल्याने ते गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, सह.फौ. छबुलाल नागरे, पो.हे.कों. किशोर सोनवणे, पो.हे.को. निलेश ब्राम्हणकर,पो.को. सुनिल राजपुत,पो.कौं.प्रविण परदेशी, पो.को. संभाजी पाटील यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे. कौ.किशोर सोनवणे नेम.भडगाव पो.स्टे. हे करीत आहेत.