सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत २ कोटी ६० लाखाचा मुद्देमाल केला जप्त

सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांची जुगार अड्ड्‌यावर कारवाई

२ कोटी ६० लाखाचा मुदद्देमाल जप्त

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०८/२०२५ – सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मौजे सोनंद ता.सांगोला जि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद रा.सोनंद ता.सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा.अथणी जि.बेळगाव हे विनापरवाना जुगार क्लब चालवित आहेत अशी बातमी असून सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते.

त्यानंतर पंढरपूर उपविभागाचे सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे पंढरपूर असे सांगोला पोलीस ठाणेस दि.२९/०८/ २०२५ रोजी ठाणे दैनंदिनीस नोंद ४६/२०२५ नोंद करुन आमचे सह ४ पोलीस पथकाचे सोबत मौजे सोनंद ता.सांगोला जि.सोलापूर येथे जावून मटन भाकरी हॉटेल च्या पाठीमागील सिमेंट पत्र्याचे खोलीत अवैधरीत्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा कारवाई केली.

मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर याठिकाणी सुरु असलेले मटन भाकरी, हॉटेलच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्र्याचे शेडमध्ये ५० इसम हे ५२ पत्त्याचा पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना मिळून आले.तसेच कसिनो काउंटर मध्ये अवैधरीत्या बेकायदेशीर देशी-विदेशी दारु ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आले.

सिमेंटच्या पत्रा शेड मध्ये पत्ते खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने,चारचाकी वाहने,रोख रक्कम, पत्त्यातील रक्कम,जवळ बाळगलेले मोबाईल,जुगार साहित्य, ५२ पानी पत्त्याचे डाव,पत्राशेडमध्ये असलेल्या खुर्च्या, टेबल,कपाट पेटी,पत्त्याचे डाव असलेले बॉक्स, कुलर, पैसे मोजण्याची मशीन, त्यामध्ये १) रोख रक्कम १६,०९,४८०/- २) ६२ मोबाईल १३,९१,१००/-रुपये ३) २६ चारचाकी वाहनाची किंमत २,०९,०००००/- रुपये २) ६१ दुचाकी वाहनाची किंमत – २९,६०,०००/- रुपये ३) देशी विदेशी दारु किंमत ११,१६५/- रुपये असा एकुण २,६८,७२,१९५ /- रुपये (अक्षरी दोन कोटी अडुसष्ठ लाख बाहत्तर हजार एकशे पच्यान्नव रुपये) चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील ५० इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४,५ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कामगीरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि/विभावरी रेळेकर, पोसई/भारत भोसले, पोसई /अनिल पाटील, श्रेणी पोसई/दत्तात्रय तोंडले, पोह निलेश रोंगे,पोह कामतकर, पोहेकॉ मंगेश रोकडे, पोह सुजित उबाळे, पोह अरुण कोळवले, पोह सातव, मपोहेकॉ शितल राउत, मपोहेकॉ शितल राउत,पोना संतोष गायकवाड, पोना सिताराम चव्हाण, पोना/७२३ शिंदे, पोना ढोणे, पोकॉ गुटाळ, पोकॉ गवळी, पोकॉ राहुल लोंढे, पोकॉ आवटे, पोकॉ जाधव,पोकॉ मदने,पोकॉ हुलजंती यांनी पार पाडली.

Leave a Reply

Back To Top