सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमा- मा खा राजू शेट्टी

यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत – मा खा राजू शेट्टी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,२८/०५/२०२४- मागील काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहे.त्यातच भरीत भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे .या व यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांना पत्राद्वारे केले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.

या पत्रामध्ये राजू शेट्टी यांनी पुढीलप्रमाणे मागणी केली आहे – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार झाल्या असल्याच्या बातम्या सर्व प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामुळे बँकेच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत. मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई केली गेलेली नाही.बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचे काम शासनच करत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.याआधी जिल्ह्यातील अनेक संघटना व सामाजिक संस्थांनीही याबाबत तक्रारी केल्या मात्र त्याची काहीच चौकशी न झाल्याने बँकेचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याचे धाडस वाढू लागले आहे.सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोनेतारण,ठेवीवरील व्याजासह,दुष्काळ,अतिवृष्ट,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई चे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत.सध्याचा झालेला घोटाळा सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखविले असल्याचे समजते.शेतकऱ्यांची लाईफ लाईन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्याकडे पहिले जाते परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव,निमणी,सिद्धेवाडी,हातनूर, नेलकरंजी, बसर्गी या सहा शाखांमध्ये शासन निधीत दोन कोटी 43 लाख रुपयाचा अपहार प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकेने आतापर्यंत पाच जणांचे निलंबन केलेले आहे परंतु निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

यापूर्वीही बँक नोकर भरती घोटाळा,साखर कारखानदार व उद्योगपतींना त्यांच्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जादा कर्ज देणे तसेच त्यांना दिला गेलेला ओटीयाचा लाभ त्याचे सोसायट्यांना दिलेले सॉफ्टवेअर अशा बऱ्याच घोटाळ्यांनी यापूर्वी बँक गाजलेली आहे वरील सर्व प्रकरणाची निपक्षपातीने चौकशी करावी लागेल.यामुळे शासनाने बँकेवरती प्रशासकाची नेमणूक करून याआधी व सध्या झालेला घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी वरती तातडीने कारवाई करावी ही विनंती.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading