माऊलींच्या पालखी सोहळ्यात सीईओ मनिषा आव्हाळे भजनात दंग…!
पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद ..!

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या भजनात दंग झाल्या. पालखी मार्गांवर धर्मपुरी येथे आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणे पुर्वी त्यांनी भजन व भारूडाचा आनंद घेतला. भारूडकार चंदाताई तिवाडी यांच्या निर्मल व हरित वारी दिंडींत गळ्यात टाळ घालून भजनात सहभागी झाल्या. विविध भजन व भारूड तसेच सामाजिक समस्यांवरील गितांची मेजवाणी भारूडकार चंदाताई तिवाडी यांनी उपस्थित भाविकांना दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ते पर्यावरण व शौचालयाचा वापर करा, कचरा करू नका. स्वच्छता राखा असे विविध संदेश या गीतामधून चंदाताई तिवाडी व त्यांच्या सहकारी यांनी दिले. सीईओ मनिषा आव्हाळे या गळ्यात टाळ घालून स्वत सहभागी झालेने कलाकारांचा आनंदीत झाले होते.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष देशपांडे यांनी केले.
माऊलींच्या पालखी सोहळा प्रमुखांशी जिल्हाधिकारी व सिईओंनी साधला संवाद ..!
पालखी मार्गांवर सोहळ्यातील वारकरी यांनी देणेच येणारे सुविधांबाबत सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त डाॅ.भावार्थ देखणे यांचेशी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पालखी मार्गांवर देणेत येत असलेले सुविधांची माहिती दिली. पालखी मार्गांवर उन्हाची स्थिती लक्षात घेऊन भाविकांना ओआरएस पावडर पुरविणेची मागणी पालखी सोहळा प्रमुख यांनी केली. सिईओ मनिषा आव्हाळे यांनी तात्काळ सर्व ठिकाणी पावडर ठेवणेत आली असून सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणेत येत असल्याचे सांगितले.

पालखी मार्गांवर पुष्पवृष्टी करून भाविकांचे स्वागत ..!
सोलापूर जिल्हा परिषदेने धर्मपुरी येथे जेसीबी च्या बकेट मधून फुले उधळून सोहळ्यातील भाविकांचे स्वागत केले. दोन्ही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव केला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे स्वत जेसीबीतून फुले टाकत होते. अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, माध्यम अधिकारी रफिक शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपस्थित होते.
सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली सुविधांची पाहणी ..!
वेळापूर पालखी तळावर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत होते त्या ठिकाणी स्वत: उभे राहून मुरूम टाकून घेतला. सायंकाळपर्यंत कामे संपविणेचे आदेश दिले. भाविकांसाठी स्नानगृहा ची सुविधा, तसेच शौचालय बसविण्याची ठिकाणे, वारकरी निवारा कक्ष आदी कामांची पाहणी त्यांनी करून सुचना दिले. पालखी स्थळावर स्वयंसेवक व स्वच्छतादूता कडून स्वच्छतेचे सातत्य ठेवणेचे सुचना दिल्या.
सातारा वासियांनी दिला माऊलींना निरोप, जिल्हाधिकारी व सिईओ झाले भावूक …..!
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या
हद्दीत दाखल होत असताना पालखी सोहळा सोलापूर जिल्हात सातारी प्रशासनाने हस्तांतर केला. त
सातारा चे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व सिईओ याशनी नागराजन यांनी पालखी सोहळा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतर केला. सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सिईओ याशनी नागराजन यांचे उपरणे व पुष्पहार घालून स्वागत केले.

