सोलापूर येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन Inauguration of Maha Arogya Shivira at Solapur
सोलापूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप व अशा अन्य आजाराचे निदान होण्यासाठी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या 52 व्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे संस्कृतिक भवन जय मल्हार चौक, बुधवार पेठ येथे करण्यात आले.
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या महाआरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्रभाग ५ अ च्या नगरसेविका स्वातीताई आवळे व सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी केले.
या महाआरोग्य शिबिरास प्रमुख उपस्थिती महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख, सभागृहनेते शिवानंद पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे यांची होती.
यावेळी समाजसेवक राजाभाऊ आलुरे,विनय ढेपे, विश्वास शिंदे, सोहन लोंढे, संजीव खिलारे, विश्वास शिंदे, सुरेश पाटोळे, नामदेव भोसले, भैया लोंढे, संदीप दुगाने, रोहन कामने, रोहित खिलारे, सौदागर क्षिरसागर, दादाराव लोंढे, रामदास शिंदे, आतीन देडे आदी उपस्थित होते.