पंढरपूरात समस्त महादेव कोळी समाजाच्या संत शिरोमणी श्री पुंडलिकराय मठामध्ये लक्ष्मणशक्ती सोहळा
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर येथील समस्त महादेव कोळी समाजाच्या संत शिरोमणी श्री पुंडलिकराय मठामध्ये दरवर्षीप्रमाणे वैशाख शु। मोहिनी एकादशी दिनांक ८ मे २०२५ रोजी श्री लक्ष्मणशक्ती सोहन संपन्न होत आहे. दि.९ मे २०२५ रोजी सकाळी आरती होऊत सर्व भाविकभक्तांना महाप्रसाद देण्यात येईल .तरी सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पुंडलिक महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर अधटराव यांनी केले आहे.
तसेच लक्ष्मण शक्तीसाठी सुचक वारक-यांनी प्रकाश महाराज अभंगराव (कोळी समाज मठ) यांचेशी संर्पक करावा असे आवाहन श्री पुंडलीकराज ॲंन्ड महादेव मंदीर ट्रस्ट ऑफ समस्त वतनदार कोळी समाज,पंढरपुर अमृतेश्वर मंदिर, सहकार चौक पंढरपुर जि.सोलापुर चे अध्यक्ष प्रभाकर अधटराव,उपाध्यक्ष अनिल अभंगराव,सचिव उमेश संगीतराव यांनी केले आहे.

