सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन
हिंदु राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार वितरण
गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – या महोत्सवाचे धर्मेण जयति राष्ट्रम् । (अर्थ: धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य आहे. सनातन राष्ट्रासाठी रामराज्य संकल्प जपयज्ञाद्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणी द्वारे सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार वितरण :
वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणार्या हिंदूवीरांना हिंदु राष्ट्ररत्न हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणार्या धर्मरक्षकांना सनातन धर्मश्री हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन :
या भव्य कार्यक्रमातून गोमंतकातील लोककलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

संतांच्या पादुकांचे दर्शन :
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत बाळाजी आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (इंदूर), समर्थ रामदासस्वामी, सज्जनगडचे श्रीधरस्वामी, श्री कानिफनाथ स्वामी, प.पू. टेंबेस्वामी, समर्थ शिष्य श्री कल्याणस्वामी, श्री साईबाबा, संत वेणाबाई, श्री सिद्धारूढस्वामी (हुबळी), प.पू. गगनगिरी महाराज, प.पू. गोंदवलेकर महाराज आदी १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे.
महाधन्वंतरी यज्ञ :
१९ मे रोजी विश्वकल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे.

