लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनी युवक जनजागृती व समाज प्रबोधन

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनी युवक जनजागृती व समाज प्रबोधन International Youth Day Youth Awareness and Social Awareness by Lions Club Solapur Twin City
   सोलापूर, 12/08/2021 :- लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त जुळे सोलापूर येथे युवकांमध्ये जनजागृती व समाज प्रबोधन करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे सचिव अभियंता सागर पुकाळे यांनी तरूण हे देशाचं भवितव्य असतात त्यामुळे तरूणाई कोणत्या दिशेने प्रवास करत आहे यावरच देशाचं भवितव्य अवलंबून असतं त्यामुळे तरूण मंडळींकडे दुर्लक्ष करू नका.

युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक 

युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील.जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे असे सांगितले.

राजेश परसगोंड यांनी आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता युवकां मध्ये असल्याचे सांगितले.

यावेळी लायन्स क्लबचे नागेश चपळग्गी, वैभव जाधव,आर्किटेक यशोमती जाधव,गुरुशांत माळगे आणि जुळे सोलापूर येथील युवक - युवतींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: