द.ह.कवठेकर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत मार्च 2025 माध्यमिक शालांत परीक्षेत धवल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमास पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर,सचिव एस.आर.पटवर्धन सर,पदाधिकारी एस.पी. कुलकर्णी,डॉ.मिलिंद जोशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.दिपाली सतपाल शिक्षक पालक संघाच्या कु.वैशाली शिंदे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक एम.आर.मुंडे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी सर तसेच शिक्षक बंधू भगिनी व इयत्ता दहावी उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी प्रशालेला प्राप्त झालेल्या 99 टक्के निकाल व प्राप्त गुणवत्तेची माहिती दिली.यावेळी त्यांनी प्रशाला गुणवत्ता वाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.संस्थेचे मानद सचिव एस आर पटवर्धन सर यांनी प्रशालेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.सत्कारास प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी विनीत शिंदे, सारिका धर्माधिकारी, अस्मिता भोसले व पालक प्रतिनिधी सतीश बुवा यांनी उत्तर दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एम.कुलकर्णी सर यांनी केले.आभार जेष्ठ पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी

1) विनीत विजय शिंदे 99.20 %
2) सानिका महेश धर्माधिकारी 97 %
3) हर्षदा सतीश बुवा 96.80 %
3)रिया प्रमोद गायकवाड 96.80 %
4) प्रणिती अशोक क्षीरसागर 96.60%
4)राजवर्धन कुमार पाटील 96.60%
5)अस्मिता अगतराव भोसले 96.20%

यांचा फेटा, हार,पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मानद सचिव एस.आर.पटवर्धन सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Back To Top