जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द.ह. कवठेकर प्रशालेचे नेत्रदीपक यश
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूरने सोलापूर येथे सुरू असलेल्या शासकीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये धवल यश संपादन केले असून प्रशालेतील अद्वैत नितीन देशपांडे या विद्यार्थ्याची विभागीय स्तरासाठी निवड झालेली आहे.
या शासकीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रशालेतील विद्यार्थी अद्वैत नितीन देशपांडे इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक जी.एस.पवार सर,प्रशांत मोरे सर,डी.एस. चव्हाण सर, शेलार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर सर,ज्येष्ठ पर्यवेक्षक एम.आर.मुंढे सर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.