वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा

वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशनची वारकरी भाविकांची फिजीओथेरपी,मसाज,चरण सेवा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने पायी चालत येत आहेत. या पायी चालत येणार्या भाविकांचा थकवा घालवण्यासाठी फिजीओथेरपी, मसाज,चरण सेवा करण्यासाठी वसंतदादा काळे मेडीकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण नर्सिंग कॉलेज,मुक्ताई नर्सिंग कॉलेज व शिवस्वराज्य मेडीकल फाऊंडेशन संचलित राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वारकरी भाविकांची सेवा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे मार्गदर्शक कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी प्रमुख पालख्यांसह विविध साधु – संताचे पालख्या पंढरीच्या दिशेने पायी चालत येत आहेत.या पायी चालत येणार्या भाविकांचा थकवा घालवण्यासाठी वारकऱ्यांची चरणसेवा,पायाची मालिश करणे, दुखणाऱ्या अंगाचा शिणवटा कमी करण्यासाठी फिजीओथेरपी करण्यात उपक्रम घेण्यात आला.सदर शिबीरात 200 विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग घेवून भाविक भक्तांची सेवा करत आहेत,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे,नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य सौ विद्या कुचेकर,प्राचार्य श्री काझी,प्राचार्य अहिरसंग व सर्व शिक्षक, राजेंद्र साळुंखे या उपक्रमासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Back To Top