सायबर गुन्हेगार पार्सलच्या नावावर करत आहेत ऑनलाइन फसवणूक

सायबर गुन्हेगार पार्सलच्या नावावर करत आहेत ऑनलाइन फसवणूक Cyber ​​criminals are committing online fraud in name of parcels

भोपाळ – मध्य प्रदेशात ऑनलाईन फसवणुकीचे वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत.यात सायबर गुन्हेगारांनी पार्सलच्या नावावर ऑनलाइन फसवणूक सुरू केली आहे. आरोपी नागरिकांकडे जातात आणि पार्सल आल्याचे सांगतात. त्या व्यक्तींने पार्सल आँर्डर दिली नसल्याचे सांगितले तर त्याला डिलिव्हरी रद्द करण्याच्या नावावर ते ओटीपी घेतात आणि त्या व्यक्तीच्या खात्यातून लाखो रुपयांची चोरी करतात. भोपाळ सायबर गुन्हा शाखेने अशा अनेक प्रकरणानंतर अलर्ट जारी करत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे .सायबर गुन्हेगारांनी आता ऑनलाइन फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे.

सायबर गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीनुसार ग्राहकाच्या घरी एक पार्सल येईल ते पार्सल आणणारा कर्मचारी तुम्हाला सांगेल की तुम्ही हे पार्सल ऑनलाईन बुक केले आहे जेव्हा तुम्ही बुकींग घेण्यास नकार देता तेव्हा पार्सल आणणारा तुम्हाला पार्सलची डिलेव्हरी रद्द करण्यास सांगेल. तो तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवेल. तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या आरोपीला सांगताच तुमच्या बँक खात्यातून रक्कम दुसर्‍या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. ओटीपी सोबतच आरोपींनी एक नवीन आँनलाईन फ्राँड करण्याची पद्धत सुरू केली आहे. पार्सल पुरवणार्‍या डिलिव्हरी बॉईज जवळ क्यूआर कोड असतो. ते मोबाईल वर ओटीपी नाही सांगितला तर स्कॅन करायला लावून फसवतात .भोपाळमध्ये पाच पेक्षा जास्त लोकां सोबत अशा घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी इंदोर मध्येही अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर पोलिसांनी अशा तक्रारींची नोंद घेऊन आरोपींचा शोध करत आहेत.

 सायबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त एसपी अंकित जैस्वाल म्हणाले की आरोपी मैत्रीच्या नावाखाली विविध प्रकारची फसवणूक करतात ही देखील नवीन पद्धत आहे. त्यांनी सांगितले की क्यू आर कोड फक्त पैसे स्विकारण्यासाठी वापरला जातो, पैसे पाठवायसाठी नाही. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा क्यू आर कोड स्कॅन करू नका कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरुन आपला ओटीपी, यूपी, आयपीन वापरू नका.

 ज्यावेळी आँनलाईन बुकींग करत असताना ती साईट सुरक्षित आहे का नाही ? हे लक्षात घेतले पाहिजे.अनेक वेळा त्या साईट बंद असतात.यात वस्तू या कमी किमतीला मिळतात. त्यानंतर या मागवलेल्या वस्तूंऐवजी दुसर्‍याच वस्तू येतात आणि मोठी फसवणूक होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: