एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजच्या श्रद्धा महाडिकची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

वाखरी ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- वाखरी येथील एम.आय.टी.ज्युनियर कॉलेजची अकरावीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा महाडिक हिने नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात यश मिळवून आपले नाव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निश्चित केले आहे. या विजयाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पंढरपूर तालुक्यातील विश्व शांती गुरुकुल वाखरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत श्रद्धा महाडिकने प्रतिस्पर्धकांना मात दिली आणि विजेतेपद पटकावले.तिचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक कौशल्याचेच नाही तर तिच्या मेहनतीचेही प्रतीक आहे.

श्रद्धाच्या या यशात तिचे क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी तिला बुद्धिबळाच्या बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले.मुख्याध्यापिका सौ.शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ यांनी श्रद्धाला प्रोत्साहन देत तिला स्पर्धेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ती हे यश मिळवू शकली.

तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या विजयामुळे श्रद्धाची आता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा तिच्यासाठी एक मोठी संधी असून या स्पर्धेतही ती चांगली कामगिरी करेल असा विश्वास कॉलेज प्रशासनाने व्यक्त करत तिच्या या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Back To Top