पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचार्यांचे मागण्यांसाठी केंद्रीस जलशक्ती मंत्र्यांना साकडे-केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील मागण्यां बाबत सकारात्मक

पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचारी यांचे मागण्यांसाठी केंद्रीस जलशक्ती मंत्र्यांना साकडे

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील मागण्यांबाबत सकारात्मक

नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०७/०९/ २०२५ – देशातील पाणी व स्वच्छता क्षेत्रात जिल्हा व तालुका व गाव पातळीवर काम करणारे कर्मचार्यांचे मागण्यांसाठी आज जलशक्ती विभागाचे मंत्री सी आर पाटील यांना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव, महाराष्ट्र व जलजीवन मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत कुमार सारस्वत राजस्थान यांचे हस्ते विठुरायाचा विणा भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.या प्रसंगी राष्ट्रीय सचिव शंकर बंडगर, संघटनेचे राष्ट्रीय महासचिव कोसलेंद्र सिंग उपस्थित होते.

देशातील सर्व कर्मचार्यांच्यासाठी एचआर पाॅलीस राबविणेत यावी.काम करणारे कर्मचारी यांचेसाठी नोकरीत संरक्षण द्यावे. जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी यांना समान काम समान वेतन देण्यात यावे.पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणारे कर्मचार्यांसाठी विमा सुरक्षा देण्यात यावे.१० वर्षापेक्षा अधिक वर्षे सेवा केलेल्या कर्मचार्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यांना सुचना देण्यात यावी. राज्यांना प्रशासकीय खर्चासाठी प्रकल्पाचे ५ टक्के निधी देण्यात यावा.राज्यात सुरू असलेले आऊटसोर्सिंग थांबविणेत यावे. राज्य व जिल्हा स्तरावर काम करणारे कर्मचारी तसेच तालुका स्तरावर काम करणारे बीआरसी व सीआरसी तसेच जिल्हा व विभाग स्तरावर पाणी गुणवत्ता व प्रयोगशाळा कर्मचारी,जल सुरक्षक यांचे मानधनात वाढ करण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोनती अभियानाच्या धर्तीवर एच आर पाॅलिसी राबविण्यात यावी.यासह विविध मागण्या करण्यात आल्या. हरियाना,उत्तर प्रदेश, हिमाचल, ओरिसा, कर्नाटक, त्रिपुरा, आदी राज्यात पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचार्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा.देशपातळीवर दिल्ली येथे स्वच्छता,पाणी व पाणी गुणवत्ता संमेलन घेऊन अधिकारी व कर्मचार्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात अशीही मागणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री यांचे निर्णयाचे स्वागत- राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव

देश पातळीवर पाणी स्वच्छता व पाणी गुणवत्ता क्षेत्रात काम करणारे कर्मचार्यांसाठी संघटन तयार करणेत आले आहे. आज केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांची भेट घेतली. त्यांनी आमच्या अडचणी जाणून घेतल्या. देशभरातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्याचे अभिवचन दिले.एच आर पाॅलिसी मुळे देशात समान काम समान वेतनाची प्रभावी अंमल बजावणी होणार आहे असेही राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत सातारा,बीआरसी सीआरसी संघटनेचे विलास निकम यांच्यासह नवी दिल्ली येथे उद्या सोमवारी केंद्रीय जलशक्ती विभागाचे सचिव अशोक के के मिना व अतिरिक्त सचिव कमलकिशोर साहेन यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांच्यावर अन्याय – राष्ट्रीय अध्यक्ष नवीन कुमार सारस्वत

राजस्थान,हरियाना,ओरिसा या राज्यात प्रकल्प संपणार असल्याच्या कारणावरून अन्याय केला जात आहे.कर्मचारी उच्च न्यायालयात आहेत.कर्मचार्यांना न्यायालया बरोबर केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी जलजीवन मिशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन कुमार सारस्वत यांनी केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांचेकडे केली.

Leave a Reply

Back To Top