परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन



पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/ २०२५ :- राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.


यावेळी मंदिर समितीच्यावतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, खाजगी सचिव अनिकेत मानोरकर,मंदीर समितीचे प्र.व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.







