पंढरपूर खून प्रकरणात आरोपी गोपीचंद उर्फ जितु कदम यास जन्मठेप; Pandharpur Murder Case

पंढरपूर खून प्रकरणात आरोपी गोपीचंद उर्फ जितु कदम यास जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय Pandharpur Murder Case

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हा सिद्ध; आरोपीस जन्मठेप व १० हजार दंड

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : Pandharpur Murder Case पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात Pandharpur City Police दाखल असलेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश नंदीमठ यांनी महत्त्वाचा निकाल देत आरोपी गोपीचंद उर्फ जितु हुकुम कदम यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५६२/२०२३ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२ व ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांनी शास्त्रोक्त आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पूर्ण करून आरोपीस अटक केली होती.तपास पूर्ण झाल्यानंतर मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची नोंद सेशन केस क्रमांक २२६/२०२३ अशी असून संपूर्ण कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.नंदीमठ पंढरपूर यांच्या न्यायालयात पार पडले. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायालयाने भा.दं.वि. कलम ३०२ व ३०७ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याचे प्रभावी कामकाज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तर सरकारी अभियोक्ता शेख यांनी यशस्वीपणे सरकारी बाजू मांडली. कोर्ट पैरवीचे काम सहाय्यक पोलीस फौजदार रविंद्र बनकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

या निकालामुळे पंढरपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा ठोस संदेश गेला असून, गंभीर गुन्ह्यांवर न्यायालय कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Leave a Reply

Back To Top