Pandharpur Taluka Police Action खर्डीत अवैध धंद्यांवर तालुका पोलिसांची मोठी कारवाई; देशी दारू,हातभट्टी,मटका बंद

Pandharpur Taluka Police Action खर्डीत अवैध धंद्यांवर तालुका पोलिसांची मोठी कारवाई; देशी दारू, हातभट्टी, मटका बंद

खर्डी गावात अवैध व्यवसायांना लगाम; तालुका पोलीस स्टेशनची धडक छापेमारी,अनेकांवर गुन्हे दाखल

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज/अमोल कुलकर्णी :Khardi Illegal Business जिल्ह्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असलेल्या खर्डी गावात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या देशी दारू,हातभट्टी, जुगार-मटका,शिंदी,मावा-गुटखा Country Liquor Hand Bhatti Case Matka Gambling Police Raid अशा अवैध व्यवसायांवर अखेर तालुका पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रातिनिधिक फोटो

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वडणे व त्यांच्या सहकारी पोलिस पथकाने खर्डी गावातील वाड्या-वस्त्या तसेच गावठाण हद्दीत छापेमारी करून अनेक ठिकाणी अवैध दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी काही स्थानिक व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

या कारवाईमुळे गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री, मटका, मावा-गुटखा यासारखी गैरप्रकारे काही प्रमाणात थांबली असून, पोलिसांच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. मात्र ही कारवाई फक्त दिखावा ठरू नये आणि भविष्यात पुन्हा अवैध व्यवसाय डोके वर काढू नये अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

येत्या काही महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुका असल्याने अवैध व्यवसायांना पाठबळ देणाऱ्या काही स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आहे. काही व्यावसायिकां कडून लाखो रुपयांचे हप्ते देऊन राजकीय वरदहस्ताच्या माध्यमातून पोलिसांना अर्थपूर्ण सहकार्य मिळत असल्याचे प्रकारही समोर आले होते,अशी चर्चा गावात आहे.

अवैध व्यवसायांमुळे गावात तंटे वाढले होते,महिलांच्या बचत गटांवरील कर्जाचा बोजा वाढत होता मात्र तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आजी-माजी पुढाऱ्यांची मिलीभगत उघड झाली असून अनेकांनी गावात येणे-जाणे कमी केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर करत असून, उशिरापर्यंत अधिकृत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

Leave a Reply

Back To Top