श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण सोमवार निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास फळा फुलांची आरास

श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण सोमवार निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास फळा फुलांची आरास Flower arrangement at Shri Vitthal Rukmini Temple on the occasion of Shrikrishna Janmashtami and Shravan Monday

छाया – सतीश चव्हाण
 पंढरपूर,नागेश आदापूरे  30/08/2021 - सोमवार दि.३०/०८/ २०२१ रोजी श्रावण कृ ८ श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण सोमवार निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपुर्ण मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती . त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते . या फुलांची आरास करणाऱ्या भाविकांची नांवे पांडूरंग रत्नाकर मोरे ,नानासाहेब बबन मोरे,मु .पो.टाळगांव चिखली,ता.हवेली, जिल्हा पुणे आहे. 

      ही आरास करण्यासाठी ऍथोरीयम,ऑर्केड, शेवंती ,कामिनी,झेंडू ,गुलाब इत्यादी फुलांचे प्रकार व अननस ,कलिंगड, सफरचंद, सिताफळ,मोसंबी, ड्रॅगन व संत्री या फ़ळांची व पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली.आरास करण्यासाठी साधारणतः २००० किलो फुले व ५०० किलो फळे वापरण्यात आली. फुलांची ही आरास डेकोरेटरचे नांव शिंदे ब्रदर्स,साई डेकोरेटर्स, पंढरपूर आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: