गणेश मूर्तिकार निलेश पार्सेकर यांच्या कलाकृतीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली भेट

सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार निलेश पार्सेकर यांच्या कलाकृतीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली भेट Shiv Sena Secretary Milind Narvekar visited the work of famous Ganesh sculptor Nilesh Parsekar

श्री पार्सेकर यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी

 पुणे दि.03/09/2021 : पुणे शहरातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार निलेश पार्सेकर यांच्या कलाकृतीची आज दि.०२ सप्टेंबर, २०२१ रोजी शिवसेना सचिव तथा मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेऊन त्यांनी तयार केलेल्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी श्री पार्सेकर यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती कशाप्रकारे तयार केली जाते, काय समस्यांना समोरे जावे लागते याची सविस्तर माहिती श्री नार्वेकर यांनी जाणून घेतली. त्यांनी तयार केलेल्या मुर्त्या ह्या जागृत असल्याचे जाणवत होते अशी भावना देखील श्री नार्वेकर यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे श्री पार्सेकर यांचे अतिवृष्टीमुळे २०१९ मध्ये झालेल्या नुकसानाची माहिती यावेळी श्री नार्वेकर यांनी घेतली व शासनाकडे प्रलंबित असलेल्या पंचनामा आणि नुकसान भरपाईसाठी मदत मिळण्याबाबत नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन देखील श्री नार्वेकर यांनी त्यांना दिली. याबद्दल श्री पार्सेकर यांनी नार्वेकर यांचे आभार मानले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: