सुशिलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

सुशिलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा – युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांचा उपक्रम Unique Birthday Wishes to Sushilkumar Shinde – Youth Congress District President Nitin Nagne’s Initiative

सोलापूर – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्यावतीने अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे 25 बाय 45 फुटाची भव्य रांगोळीतून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. या रांगोळीचे उद्‌घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सोलापूर मनपा गटनेते चेतन नरोटे,शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, शहराध्यक्ष बाबा करगुळे, गणेश डोंगरे,सागर राठोड, शैलेश पाटील, गणेश सुतार,सौदागर जाधव,समीर कोळी, अमर सुर्यवंशी, सागर कदम आदि उपस्थित होते.

सोलापूरकरांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होवो
सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी कर्तृत्व व पक्षनिष्ठेच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. आता येणाऱ्या काळात साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा – सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन नागणे

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: